
विजयनगर परिसरातील भगतसिंग वॉर्ड येथील घटना
गोंदिया : बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाला घेऊन भावाने मारहाण करून धमकी दिल्याने तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत शहरातील विजयनगर परिसरातील भगतसिंग वॉर्ड येथे बुधवारी (दि.८) सायंकाळी ही घटना घडली. रितिक भीवराम क्षीरसागर (२५, रा. विजयनगर, भगतसिंह वॉर्ड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
रितिकचे मोहल्ल्यातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. याबाबत मुलीच्या भावाला माहिती पडले व त्याने रितिकला मारहाण करून धमकी दिली होती. यावरून रितिकने बुधवारी (दि.८) सायंकाळी ४ ते ७ वाजता दरम्यान आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. फिर्यादी भीवराम भोजराज क्षीरसागर (५२, रा. विजयनगर) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग नोंद केला आहे.



