चंद्रपूरविदर्भ

धानाची मळणी करताना पुंजण्यासह ट्रॅक्टर थ्रेशर जळून खाक

विठ्ठलवाडा शिवारातील घटना

गोंडपिपरी : पीक जोमदार आले. धान कापणी करून मळणीसाठी ढीग रचला. मळणी करीत असतानाच अचानक मळणी यंत्रालाच आग लागली. यात ट्रॅक्टर जळाले. सोबतच धानाचा ढीगही आग लागून राख झाला. अन्य एक ढीग अर्धवट जळाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. ही घटना शनिवारी (दि. ११) दुपारी २ वाजेच्या सुमारास विठ्ठलवाडा शेतशिवारात घडली.

विठ्ठलवाडा येंनबोथला मार्गावर शंकर पिंपळकर आणि वासुदेव पिंपळकर यांची शेती आहे. खरीप हंगामात त्यांनी आपल्या चार एकर शेतात धानाची लागवड केली. धानाची कापणी करून मळणीसाठी शेतातच धानाचा ढीग रचला. वडील वासुदेव पिंपळकर यांनीदेखील आपल्या शेतीतील धान कापून शंकर यांच्या धानाच्या ढिगालगत आपलाही धानाचा ढीग रचला होता. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धावाधाव धानाच्या ढिगाऱ्याला आग लागल्याची माहिती गावकऱ्यांनी धाव घेतली. शेतातच विहीर असल्याने आग विझविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत धनाचा एक ढीग जळून राख झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button