
शिबिराच्या माध्यमातून घेतला उपचार
गडचिरोली : गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथतर्फे गाव पातळी व्यसन उपचार शिबिराचे आयोजन केले जाते. विविध गावात आयोजित शिबिराच्या माध्यमातून एकूण ७८ रुग्णांनी उपचार घेत दारूचे व्यसन सोडण्याचे ठरविले आहे.
गडचिरोली तालुक्यातील आंबेशिवनी १९, सावरगाव १५, अहेरी तालुक्यातील पल्ले ८, मुलचेरा तालुक्यातील मुकडी येथे ९, कोरची तालुक्यातील शिवराजपूर येथे ५ तसेच चामोर्शी तालुक्यातील मक्केपल्ली येथील गाव पातळी व्यसन उपचार शिबिराला एकूण २२ रुग्णांनी भेट दिली. शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांना दारूचे व्यसन कशामुळे लागते, व्यसन कमी करण्याचे उपाययोजना, नियमित औषधोपचार आदींबद्दलची माहिती समजावून सांगण्यात आली. यासाठी लाभलेले तज्ञ समुपदेश व संयोजक यांनी रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्या समस्यांचे समाधान केले. सोबतच औषधोपचार देखील देण्यात आला. गाव पातळी शिबिरातून आतापर्यंत अनेक रुग्णांनी दारूचे व्यसन सोडले आहेत, तुम्हीही शिबिरातून उपचार घेऊन दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचे आवाहन करण्यात आले.



