गडचिरोलीविदर्भ

क्रीडांगणाच्या कामाची पाहणी करत माजी खा. नेते यांनी घेतला आढावा

चामोर्शीत भाजपचे सदस्यता अभियान

चामोर्शी : येथील तालुका क्रीडांगणाच्या जागेवरील अतिक्रमण हटविल्यानंतर अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेल्या तालुका क्रीडा संकुलाचे काम मार्गी लागले आहे. संपूर्ण चामोर्शी तालुक्यासाठी एक अद्ययावत व दर्जेदार क्रीडांगण उभारण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या बांधकामाची माजी खासदार अशोक नेते यांनी पाहणी केली. आपल्या पाठपुराव्याने हे काम मार्गी लागल्याचे समाधान असून क्रीडा संकुलातील विविध कामे लवकर पूर्ण करावीत, अशी सूचना यावेळी नेते यांनी केली.

सदर क्रीडा संकुलाच्या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण झाल्यामुळे क्रीडांगणाच्या विकासाला अडथळा निर्माण झाला होता. जिल्हा क्रीडा अधिकारी व तहसीलदार यांच्या प्रयत्नांमुळे हे अतिक्रमण हटवण्यात यश आल्यानंतर हे या कामाला सुरूवात झाली.

या भेटीदरम्यान माजी खा.नेते यांनी बांधकामाची गुणवत्ता व प्रगतीची माहिती घेतली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर क्रीडांगणाचे काम पूर्ण करण्याची सूचना केली.

यावेळी भाजप सहकार प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष पिपरे, जेष्ठ नेते मनमोहन बंडावार, नगरसेविका रोशनी वरघंटे, माजी जि.प. सदस्य शिल्पा राय, आदिवासी मोर्चाचे जिल्हा महामंत्री रेवनाथ कुसराम, शहर महामंत्री माणिक कोहळे, शहर महामंत्री नरेश अलसावार, शहर महामंत्री वासुदेव चिचघरे, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री यश गण्यारपवार, तालुकाध्यक्ष निखिल धोडरे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष कविता किरमे, एकनाथ सातपुते, विनोद किरमे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

“समर्थ आणि विकसित भारत घडविण्यासाठी भाजपाचा भाग बना,” असे आवाहन करत माजी खासदार व भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी चामोर्शी शहरातील जनतेला प्रोत्साहित केले. चामोर्शीत “घर चलो” सदस्यता अभियानाला जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळाला. या अभियानाद्वारे पक्षाची सदस्यसंख्या वाढविली जात असून या उपक्रमाने स्थानिक भाजप संघटनेला बळकटी येणार आहे. या अभियानामुळे जनतेशी थेट संपर्क साधला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button