
माजी क्रिकेटर अझरुद्दिन व प्रसिद्ध मराठी अभिनेत्री राहणार उपस्थित
गडचिरोली : विजय वडेट्टीवार फॅन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने येत्या १९ जानेवारीपासून गडचिरोली प्रीमिअर लिगच्या (लेदर बॉल) आठव्या सिजनाचा थरार सकाळी ८ वाजतापासून जिल्हा प्रेक्षागार मैदानावर रंगणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मो. अझरुद्दिन यांच्यासह एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री व आ. विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती फॅन्स क्लबचे विनोद शनिवारे, अॅड. राम मेश्राम यांनी शनिवारी (ता.४) पत्रकार परिषदेत दिली.
दहा वर्षांनंतर परत एकदा गडचिरोली प्रीमिअर लिगला सुरुवात होत आहे. या लिगमध्ये जिल्ह्यातील सात संघ सहभागी असून ही स्पर्धा १५ दिवस चालणार आहे. दररोज सकाळी ८ वाजता सामन्यांना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी ५ लाख रुपये प्रथम, ३ लाख द्वितीय व १ लाख रुपये तृतीय बक्षीस विजेत्या संघांना देण्यात येणार आहे. सोबतच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आदी उत्कृष्ट खेळाडूंना २ लाख रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ९० खेळाडूंची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी ६५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा यू ट्यूबवर पाहता येणार आहे.
गडचिरोली प्रीमिअर लिग मध्ये वडसा वडर्स या संघाचे मालक गणेश, राजेश, डॉ. जुमनाके व सागर नाकाडे तर रामनगर रॉयल्सचे मालक अविनाश वरगंटीवार, बंटी खडसे, लौकीक भिवापूरे, रोहित बघेल व सनरायजर्स गडचिरोली या संघाचे मालक शेखर आखाडे, सतीश त्रिनगरीवार, आशुतोष कायरकर, सुपर स्ट्रायकर्स संघाचे मालक सुरज वासेकर, मंगेश आखाडे, अभिजीत अंडेलकर व आनंद तसेच गडचिरोली लॉयन्स संघाचे मालक पप्पू शेख, पवन गेडाम, डॉक्टर्स एलेवन संघाचे मालक डॉ. अनंता कुंभारे, डॉ. बाळू सहारे, डॉ. यशवंत दुर्गे व अद्वय अप्पलवार व अक्षय वॉरिअर्स संघाचे मालक अक्षय हेमके, अक्षय धकाते असे असल्याची माहिती विनोद शनिवारे, अॅड. राम मेश्राम यांनी दिली.
पत्रकार परिषदेला विजय वडेट्टीवार फॅन्स क्लबचे राकेश नागरे, अजय तुम्मावार, मनिष गुड्डेवार, मनिष वाळके, प्रशांत रच्चावार, अतुल जगनाडे, मनोज देशमुख, राहुल बारसागडे, सचिन मडावी उपस्थित होते.



