
गडचिरोली : स्थानिक कोहळी समाज संघटना शाखा गडचिरोलीतर्फे शहर व परिसरातील कोहळी समाज बांधवांचा व महिलांचा स्नेहमिलन मेळावा 19 जानेवारीला चंद्रपूर रोड वरील श्री घोगरे सभागृह कनेरी येथे दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी दादाजी पाटील संग्रामे, उद्घाटक म्हणून पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. परशुराम खुणे, तर प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) विवेक नाकाडे, डॉ. आशिष खुणे, डॉ. मनीष पर्वते, डॉ. स्नेहा नाकाडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी मागील जमाखर्च, स्त्रियांकरिता सामूहिक हळदीकुंकू कार्यक्रम, सत्कार समारंभ, समाजाच्या विकासाबद्दल चर्चा, मनोरंजनात्मक व बौद्धिक खेळ इत्यादी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
तरी परिसरातील सर्व कोहळी बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष खुशालराव मस्के यांनी केले आहे.



