क्रीडाभंडाराविदर्भ

मैदानी खेळातून आत्मविश्वास व नेतृत्व गुणाचा विकास – आ. नाना पटोले

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

भंडारा : शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांमधून आत्मविश्वास व नेतृत्व गुणाचा विकास होतो. विजयाचा उन्माद नाही, पराभवाने खचून न जाता पुन्हा परिश्रम, सराव करुन यश मिळवावे, असे प्रतिपादन आमदार नानाभाऊ पटोले यांनी केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग भंडारा द्वारा तीन दिवशीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन महालगाव/सुकळी येथे करण्यात आले. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिप अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनी भूषविले. विशेष अतिथी खा. डॉ. प्रशांत पडोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, समाज कल्याण सभापती मदन रामटेके, सभापती महिला व बालकल्याण स्वाती वाघाये, शिक्षण सभापती रमेश पारधी, सरपंच नंदकिशोर कावळे, उपसरपंच ज्योती खोटेले व प्रमुख अतिथी पूजा हजारे, शितल राऊत, वनिता डोये, अनिता भुरे, माहेश्वरी नेवारे, परिसरातील सरपंच उपसरपंच सदस्यगण उपस्थित होते.

बलदेवता बजरंगबलीच्या पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. अतिथींना गटशिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वात चमूंनी मानवंदना दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा महालगावच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम लेझीम नृत्य सादर केले. महोत्सवात स्वदेशी कबड्डी व खो-खो हे मैदानी सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ तसेच समूहगान, समूहनृत्य नाटिका हे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी प्राथमिक रविंद्र सोनटक्के यांनी, आभारप्रदर्शन शिक्षणाधिकारी माध्यमिक रविंद्र सलामे यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य मदन रामटेके यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा महालगाव व प्राथमिक शाळा या महालगाव टोली,  शामानंद हायस्कूल महालगाव ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामवासियांनी खेळाडूंची भोजन, निवासाची उत्तम व्यवस्था केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button