
देसाईगंज : तालुक्यातील ग्रामपंचायत पोटगाव येथील नागरिकांना शुद्ध पेयजल मिळावे यासाठी प्रधानमंत्री खनिज विकास निधीतून जल शुध्दीकरण व शितकेंद्र प्लांट मंजूर करण्यात आले आहे. सदर काम जलद गतीने पूर्ण झाले असून आज या ‘जल शुद्धीकरण व शितकेंद्र प्लांट’ (एटीएम आरओ प्लांट)चे लोकार्पण आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते पार पडले.
याप्रसंगी सरपंच विजयजी डडमल, उपसरपंच पंकजजी वंजारी, सचिव महेंद्र देशमुख, ग्रा.पं. सदस्य लता आंबडारे, नंदा गावतूरे, यशोधरा मेश्राम, ममता गजभिये, प्रतिष्ठित नागरिक शिवाजी राऊत, अशोक गजभिये, नरेंद्र गजपूरे, महेंद्र सोनपिपरे, मिथुन रामटेके व गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.



