क्राईममहाराष्ट्रमुंबई

रेल्वेतून लाल चंदनाची तस्करी ; तब्बल ९३ किलो लाल चंदन जप्त

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात रेल्वे पोलिसांच्या दक्षता पथकाने लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या रियल लाइफ पुष्पा ला अटक केली आहे. रेल्वेतून लाल चंदनाची तस्करी केली जात असल्याची टीप रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत मुंबई सेंट्रल स्थानकात आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तब्बल ९३ किलो लाल चंदन जप्त करण्यात आले आहे.

आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी केली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात है लाल चंदन आरोपीने आणले कुठून? ते कुणाला विकले जाणार होते? याबद्दलची माहिती पोलीस घेत आहेत. यामागे मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसाच तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

आरोपी रेल्वेच्या मालडब्ब्यातून लाल चंदनाचे छोटे छोटे तुकडे करुन घेऊन प्रवास करत होता. पोलिसांनी तपासणी केली असता आरोपी रंगेहात हाती लागला. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या चंदनाचे वजन केले असता ते ९३ किलो इतके भरले आहे. याची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button