गडचिरोलीविदर्भ

माजी आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते वघाळा/बर्डी येथील जल शुध्दीकरण व शितकेंद्र प्लांटचे लोकार्पण

आरमोरी : आरमोरी तालुक्यातील वघाळा/बर्डी ग्रामपंचायत येथील नागरिकांना शुद्ध पेयजल मिळावे यासाठी प्रधानमंत्री खनिज विकास निधीतून जल शुध्दीकरण व शितकेंद्र प्लांट मंजूर करण्यात आले आहे. सदर काम जलद गतीने पूर्ण झाले असून 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त या जल शुद्धीकरण व शितकेंद्र प्लांटचे लोकार्पण आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते पार पडले.

याप्रसंगी भाजपा जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, भाजपा तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, सरपंच मिथुन प्रधान, उपसरपंच अनवले, सचिव टिकले, अशोक माकडे, चेतन भोयर, धोटे, बांधते, पुष्पा श्रीरामे, साधुजी राऊत, केशव ठाकरे, होमराज माकडे, केशव प्रधान, सदाशिव धोटे, राघो केसर, जितेंद्र ठाकरे व गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button