डॉ. मिलींद नरोटेंनी उमेदवारी मिळण्याबाबत आपली भेट घेतली होती – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

विदर्भामध्ये ४५ पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील – वडेट्टीवार
गडचिरोली : काँग्रेस हा सर्वसामान्य कार्यकत्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे, पक्षाने मनोहर पोरेट्टीसारख्या संयमी व मनमिळावू स्वभावाच्या कार्यकर्त्याला संधी देऊन सन्मान केला आहे. लोकसभा निवडणूकीतील विजयामुळे पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. काँग्रेसकडूनच विधानसभा जिंकण्याची अधिक शक्यता असल्याने भाजपाचे डॉ. मिलींद नरोटेंनी उमेदवारी मिळण्याबाबत आपली भेट घेतली होती, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ३० ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून केला.
गडचिरोली शहरातील चामोर्शी रोड येथील सेलिब्रेशन फंक्शन हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार प्रहार करत चांगलाच समाचार घेतलेला आहे.
वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले की, राज्यातील महायुती सरकारला जनता कंटाळली आहे. राज्यात बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, राज्यात महायुती सरकारने बेरोजगारांना, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेले आहे अशा या आरक्षण विरोधी सरकारला या निवडणुकीत चांगलाच जनता धडा शिकवणार आहे, येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे किमान १७५ ते १८० उमेदवार निवडून येऊन सरकार महाविकास आघाडीचीच बनेल तथा विदर्भामध्ये ४५ पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वास सुद्धा वडेट्टीवारांनी व्यक्त केला
पत्रकार परिषदेला खासदार नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, उमेदवार मनोहर पोरेटी, माजी जिल्हा परिषद सदस्य राम मेश्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, रजनीकांत मोठघरे, हसन गिलानी, प्रभाकर वासेकर, राजेश कात्रटवार समशेर खार पठाण, मलिक बुधवानी, प्रशांत थोरात, यांचे सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.



