क्राईमगडचिरोलीविदर्भ

विद्युत प्रवाहाने नीलगायीची शिकार ; १२ आरोपींना अटक

गिलगाव जंगल परिसरातील घटना ; एक आरोपी पसार  

चामोर्शी : गडचिरोली वनविभाग, वनपरिक्षेत्र कार्यालय कुनघाडा रै. अंतर्गत येणाऱ्या गिलगाव (जमी.) जंगल परिसरात विद्युत प्रवाह लावून नीलगायीची शिकार केल्याप्रकरणी 12 आरोपींना अटक केल्याची कारवाई शुक्रवारी (दि.31) जानेवारीला दुपारच्या सुमारास केली. यातील एक आरोपी फरार झाला असून, वन विभागाचे पथक त्याचा शोध घेत आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अजय परशुराम मंटकवार, नीलेश शालीक तुनकलवार, काशिनाथ मंगरू वडेंगकवार, भूषण अशोक तुनकलवार, प्रकाश मंगरू मंटकवार, गणेश शालीक तुनकलवार, शत्रुघ्न मंगरू मंटकवार, नितीन कारू आतला, किसन वसंत सिडाम सर्व रा. गिलगाव (जमि), महेश कालिदास तुनकलवार, श्रीकृष्ण बारीकराव चौधरी रा. मंजेगाव, चांगदेव दशरथ मुसद्दीवार रा. वालसरा अशी आरोपींची नावे आहेत. फरार आरोपीचे नाव कळू शकले नाही.

माहिती मिळताच कुनघाडाचे वनपरिक्षेत्राधिकारी एम. ए. तावाडे यांच्या मार्गदर्शनात वनाधिकारी व पंचांनी मिळून अजय मंटकवार याच्या घरी जाऊन चौकशी केली असता. एका जर्मन भांड्यात वन्यप्राण्याचे शिजवलेले मांस आढळून आले. त्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता, शिकार करण्याकरीता सोबत असलेल्या इतर सहआरोपींची त्याने नावे सांगितली. त्यावरून नीलेश तुनकलवार, काशिनाथ वडेंगकवार, भूषण तनकलवार, प्रकाश मंटकवार, गणेश तुनकलवार यांच्या घराची पाहणी केली असता, त्यांच्या घरून वन्यप्राण्याचे मांस आढळून आले. त्यांना विचारणा केली असता, त्यांनी नीलगाय या वन्यप्राण्याची शिकार करून त्याचे मांस शिजवून खाण्याचे उद्देशाने घरी आणल्याचे सांगितले. तसेच काही मांस शत्रुघ्न मंटकवार, नितीन आतला, किसन सिडाम, महेश तुनकलवार, श्रीकृष्ण चौधरी, चांगदेव मुसद्दीवार यांना विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार आरोपींना ताब्यात घेवून जप्तीनामा व मोका पंचनाम करण्यात आला. आरोपींना वनपरिक्षेत्र कार्यालय कुनघाडा रै. येथे बोलावून अधिक चौकशी केली असता, आरोपींनी नीलगाय वन्यप्राण्याची शिकार केल्याचे कबूल केले. यावरून त्यांच्या विरूध्द वनअपराध क्रमांक 07686/192144 (1) अन्वये भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वनगुन्ह्याची नोंद करण्यात आली.

प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना कुनघाडा रै. वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात, बांधण्यात आलेल्या नविन वनकोठडीत नेण्यात आले. आवश्यक सर्व कारवाई केल्यानंतर सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करून, त्यांना प्रथम श्रेणी न्यायालय, चामोर्शी येथे हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना 1 फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी सुनावली होती. आज, वनकोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सर्व आरोपींची 15 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

सदर कारवाई गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) पाटील, वनपरिक्षेत्राधिकारी एम. ए. तावाडे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक आर. पी. धाईत, क्षेत्र सहाय्यक एस. एस. खोब्रागडे, वनरक्षक आर. एस. बगडे, आर. एस. चिचघरे, एन. बी. गोटा, एम. आर. देवाडे, वनमाला उरेते, पी. ई. तडोसे, एन. की. वाडगुरे, बी. एम. नरोटे, एच. एम. मडामे. ए. एम. टेकाम, एस. यु. खोब्रागडे, संगणक चालक नंदू वाघाडे, वाहन चालक मुकेश हजारे तसेच सर्व वनकर्मचारी, वनमुजूर यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button