गडचिरोलीविदर्भ

राजाराम येथील बीएसएनएल टॉवर बनले शोभेची वस्तू

बीएसएनएल सेवा सुरळीत करण्याची मागणी

अहेरी : तालुक्यातील राजाराम (खांदला) येथे गेल्या दोन, तीन महिन्यापासून बीएसएनएल सेवा सातत्याने खंडित होत असून मोबाईल धारकांसाठी ही नेहमीचीच डोकेदुखी झाली आहे. येथील बीएसएनएल टॉवर शोभेची वस्तू बनले आहे.

शाळेचे व कार्यालयीन कामकाज आज घळीला संपूर्ण ऑनलाईन असून अशा महत्त्वपूर्ण कामकाजात खूप मोठी अडचण निर्माण होत आहे. याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असून नागरिकात संताप व्यक्त केल्या जात आहे. या परिसरात राजाराम, खांदला, पत्तीगाव, कोत्तागुडम, चिरेपल्ली, मरनेल्ली, कोंकापल्ली, सूर्यपल्ली, रायगट्टा, इत्यादी गावाचा समावेश असून कित्येक वर्षांपासून बीएसएनएल सिम उपयोगात आणत असून सध्या स्थितीत सिमधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बीएसएनएलची सेवा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी परिसरातील मोबाईल धारकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button