
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील गडचिरोली शहर व तालुका कार्यसमितीची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देशानुसार जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी यांचे प्रमुख उपस्थितीत १५ जुलै रोजी पत्रकार भवन, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली आहे.
तरी या बैठकीला अपेक्षित तालुक्यातील सर्व बूथप्रमुख, बूथपालक, शक्तीकेंद्र प्रमुख, तालुका कार्यकारिणी, पं.स. प्रमुख, जि.प. प्रमुख, शहर पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी सर्वांनी वेळेवर उपस्थितीत राहावे, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.



