गडचिरोलीविदर्भ

पराभवाने खचून न जाता सतत जनतेच्या सेवेत कायम राहून भाजपा संघटनेचे काम करत राहीन – माजी खा. अशोक नेते

चामोर्शी शहर व तालुका भाजपा कार्यकारिणीची संघटनात्मक बैठक

चामोर्शी : मी जेव्हा आमदार असताना चामोर्शी अगोदर ग्रामपंचायत होती. त्यावेळी आमचे भाजपाचे जेष्ठ नेते माणिक कोहळे यांच्या पत्नी सरपंच होत्या. तेव्हा या चामोर्शी शहरातील जनतेला शुद्ध पिण्याचा पाणी मिळावे यासाठी सर्व प्रथम पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यात माझा सिंहाचा वाटा आहे. विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणारे तिर्थक्षेत्र मार्कंडा देवस्थानचे काम मार्गी लागले आहे. यासह सुरजागड लोह प्रकल्पाची उभारणी, रेल्वे, चिचडोह, कोटगल बॅरेज, सिंचनाचे प्रश्न, नॅशनल हायवे, असे अनेक कामे लोकसभा क्षेत्रात करण्यात आले आहेत. विरोधकांनी संविधान व खोटा अप्रचार करून मतदारांची दिशाभूल केली. आता पराभवाचे कारणे न शोधता व इथेच न थांबता पुन्हा नव्याने जोमाने पराभवाला खचून न जाता पुढे ही जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार, असे मत माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी शहर व तालुका भाजपा कार्यकारिणीची संघटनात्मक बैठक सावतेली समाज सभागृह, चामोर्शी येथे १५ जुलै रोजी घेण्यात आली. बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

बैठकीला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आमदार डॉ. देवराव होळी, ओबिसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेश भुरसे,‌ लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मिलींद नरोटे, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, जिल्हा सचिव दिलिप चलाख, जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, ता. महामंत्री विनोद गौरकर, ता. महामंत्री संजय खेडेकर, बंगाली आघाडीचे नेते सुरेश शहा, ता. महामंत्री काशिनाथ बुरांडे, नगरसेविका रोशनी वरघंटे, माजी न्यायाधिश दिक्षित, दलित आघाडीचे धर्मप्रकाश कुकुडकर, जेष्ठ नेते श्रावण सोनटक्के, तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button