
एम.डी. प्रभाकरन यांचेसह माजी आ. डॉ. देवराव होळी यांची उपस्थिती
गडचिरोली : लॉयड्स अँड मेटल्स कंपनीच्या वतीने गडचिरोली एमआयडीसी परिसरात गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL-2025) भव्य दिव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट सामन्याच्या उद्घाटनाला विश्वविख्यात क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी हजेरी लावली. या भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्याला लॉयड्स अँड मेटल्सचे एम.डी. प्रभाकरण, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
गडचिरोली सारख्या अतिदुर्गम जिल्ह्यात अशा प्रकारच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन कधीही झालेले नाही. असे आयोजन केल्याबद्दल माजी आ. डॉ. देवराव होळी यांनी लॉयड्स अँड मेटल्सचे अभिनंदन केले आहे. यातून जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना भविष्यात मोठ्या संधी चालून येणार आहेत. 28 फेब्रुवारी पर्यंत या क्रिकेट सामन्यांचा आनंद जिल्हा वासियांना घेता येणार आहे. त्यामुळे जिल्हा वासियांनी मोठ्या संख्येने या सामन्यांचा आनंद घ्यावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले आहे.



