क्राईमचंद्रपूरविदर्भ

चाकूने वार करून युवकाची हत्या

बिबी येथील रामनगर परिसरातील घटना

कोरपना : तालुक्यातील बिबी येथील रामनगर परिसरातील एका युवकावर चाकूने सपासप वार करून भरदिवसा हत्या केल्याची खळबळजनक ही घटना गुरुवार (दि. ६) दुपारी १२: ३० वाजेच्या सुमारास घडली. शिवराज पांडुरंग जाधव (२१) मृतकाचे नाव आहे. हत्येप्रकरणी गडचांदूर पोलिसांनी आरोपी अविनाश राधाकृष्ण पिल्ले (३०) व आशिष राधाकृष्ण पिल्ले (२४) या दोघांना अटक केली.

मृतक शिवराज जाधव आणि आरोपी अविनाश व आशिष पिल्ले यांच्यात दुपारी काही कारणांवरून वाद झाला. दरम्यान, आरोपी अविनाश त्याचा भाऊ आशिष याने शिवराजवर चाकूने सपासप वार केला. त्यात शिवराज जागीच ठार झाला. हत्येनंतर आरोपींनी कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला शिवराज मृतदेह फेकून दिला. घटनेची माहिती मिळताच गडचांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम व पथक घटनास्थळी पोहोचले. दोनही आरोपी भावंडांना पोलिसांनी अटक केली. हत्येचे कारण कळू शकले नाही. पोलिस कसून तपास करीत आहेत.

दोनही आरोपींवर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. वार्डातील महिलांना धमकी देणे, चाकू दाखविणे, अश्लील शिवीगाळ करणे व लोकांत दहशत पसरविणे असे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत. अटकेतील आरोपींविरूद्ध भारतीय न्या संहिता १०१ (१), १४० (१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button