क्राईमगडचिरोलीविदर्भ

वाहनचोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ; देसाईगंज पोलिसांची कारवाई

देसाईगंज : दुचाकी वाहनांची चोरी करून ती विक्री करणाऱ्या आरोपी युवकाला देसाईगंज पोलिसांनी अटक केली. समीर राजरतन चहांदे (३६ वर्ष) असे त्याचे नाव असून तो ब्रम्हपुरी तालुक्यातील रूही येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून चोरीतील सहा दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, देसाईगंज पोलिसांनी ६ फेब्रुवारी रोजी वाहन चोरीबाबात कलम ३०३ (२) भा.न्या.सं. अन्वये अप.क्र. ५३/२०२५ गुन्हा दाखल केलेला होता. सदर गुन्ह्याचा तपास सुरु असताना ७ फेब्रुवारी रोजी तपास अधिकारी सपोनि संदीप आगरकर यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार समीर चहांदे हा देसाईगंज येथे त्याच्या ताब्यातील दुचाकी विकण्याच्या तयारीत असल्याचे कळले. त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ते पथकासह आरोपीचा शोध घेण्याकरिता रवाना झाले. सदर ठिकाणी पोहचताच आरोपीचा शोध घेऊन विचारपूस केली असता त्याच्या जवळ असलेले हिरो कंपनीचे एचएफ डिलक्स वाहन (क्र. एमएच ३३ वाय ३७२०) हे चोरीचे असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

अटकेनंतर आरोपीची सखोल चौकशी केली असता, पोस्टे देसाईगंज येथे दाखल 1) अप.क्र. 53/2025 कलम 303(2) भा.न्या.सं., 2) अप.क्र. 520/2023 कलम 379 भा.दं.वी., 3) अप.क्र. 173/2023 कलम 379 भा.दं.वी., तसेच पोस्टे आरमोरी येथे दाखल 4) अप.क्र. 023/2025 कलम 303(2) भा.न्या.सं., आणि पोस्टे ब्राम्हपुरी. जि. चंद्रपुर येथे दाखल 5) अप.क्र.16/2025 कलम 303(3) भा.न्या.सं. व 6) अप.क्र. 52/2025 कलम 303(2) भा.न्या.सं. अशा विविध पोस्टे येथील अभिलेखावर दाखल एकुण 06 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच या व्यतिरिक्त सदर आरोपीने पाथरगोटा जि. गडचिरोली गावाच्या हद्दीतून एक दुचाकी बजाज कंपनीची डिस्कव्हर 150 सि.सी. वाहन क्रमांक एमएच 33 जे 2458 चोरी केल्याचे उघड झाले आहे.

एकुण सहा गुन्ह्यातील सहा दुचाकी वाहन किंमत अंदाजे 3,05,000/- रुपये व अन्य एक दुचाकी वाहन किंमत अंदाजे 75,000/-रुपये असा एकूण 3 लाख 80 हजारांचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे या आरोपीवर पोलीस स्टेशन ब्राम्हपुरी येथे चोरी, बलात्कार इ. विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोस्टे देसाईगंज येथील सपोनि आगरकर हे करीत आहेत.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी (कुरखेडा) रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज ठाण्याचे पो.नि. अजय जगताप यांच्या नेतृत्वात सपोनि संदीप आगरकर, पोलीस शिपाई दिनेश सोनकुसरे, सतीश बैलमारे, विलास बालमवार, नितेश कडव यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button