गडचिरोलीविदर्भ

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रस्तुतीने दर्शक मंत्रमुग्ध

आदर्श पदवी महाविद्यालयामध्ये वार्षिक महोत्सव

गडचिरोली : सुमधुर संगीत, नाटक, विविध वेशभूषेतील नृत्य, देशभक्तीपर नृत्य, भक्तिगीते अश्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रस्तुतीने उपस्थित दर्शक मंत्रमुग्ध झाले. गणमान्य आतिथिंच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठाचे घटक आदर्श पदवी महाविद्यालयाचा वार्षिक महोत्सव “कौशल्यस्पर्ष २०२४-२४” चा उद्घाटन समारंभ गुरुवार, १३ फेब्रुवारीला उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदना व महाविद्यालयाची वार्षिक पुस्तिका ‘ कौशल्यस्पर्ष’च्या विमोचनाने करण्यात आली. यावेळी “कौशल्यस्पर्श – क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२४-२५” चे उद्घाटक ॲड. आशिष जयस्वाल (राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा सह पालकमंत्री, गडचिरोली), कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ. श्रीराम कावळे (प्र.-कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ) यांनी  भूषविले, विशेष अतिथी म्हणून डॉ. मिलिंद नरोटे (आमदार, विधानसभा क्षेत्र),  डॉ. अनिल हिरेखण (कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी तरुणांमध्ये कौशल्य निर्माण करण्यासाठी महाविद्यालयाची प्रतिबद्धता व त्यासाठी गोंडवाना विद्यापीठाचे प्रयत्न याचे ॲड. आशिष जयस्वाल यांनी कौतुक केले व भविष्यात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील असू असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना डॉ. कृष्णा कारू यांनी महाविद्यालयाच्या विविध कौशल्यपूरक अभ्यासक्रमांची माहिती दिली.

सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, भारतातील विविध संस्कृतीचे दर्शन, महाराष्ट्र लोकनृत्य आणि विशेष म्हणजे आदिवासी नृत्य प्रस्तुतीने दर्शक भारावून गेले.

कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाच्या सहा. प्राध्यापिका राजेश्वरी परिहार व रेणुका गव्हारे यांनी केले तर आभार डॉ. अनिल हिरेखण (कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ) यांनी मानले. यावेळी आदर्श पदवी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे पालक तसेच विद्यापीठाचे सन्माननीय अतिथी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button