क्राईमगोंदियाविदर्भ

गांधीधाम एक्सप्रेसमधून ८.२ किलो गांजा जप्त

गोंदिया : रेल्वेच्या माध्यमातून अवैधरित्या मादक पदार्थाची तस्करी होत असल्याचे अनेक घटना उघड झाल्या आहेत. यावर आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलकडून ऑपरेश नारकोस राबविण्यात येत आहे. यातंर्गत रेल्वे सुरक्षा बलच्या वतीने गांधीधाम साप्ताहिक एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये तपासणी करण्यात आली असता ८.२२४ किलोग्रॅम गांजा मिळून आला. रेल्वे पोलिसांनी गांजा जप्त करून गुन्हा नोंद केला आहे. जप्त करण्यात आलेला गांजा १ लाख ६४ हजार ४८० रूपये किंमतीचा आहे.

रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलच्या वतीने प्रवाशांच्या सुरक्षित प्रवाशासाठी विविध उपाययोजना करण्यात येतात. याच अनुसंगाने रेल्वेतून होणाऱ्या मादक पदार्थाच्या तस्करीवर आळा बसावा, याकरीता ऑपरेशन नारकोस राबविण्यात येत आहे. आरपीएफ गोंदियाचे प्रभारी वी. के. तिवारी यांच्या नेतृत्वात रेसुबच्या जवानांनी दुर्ग-गोंदिया रेल्वे स्थानकदरम्यान पुरी – गांधीधाम साप्ताहिक एक्सप्रेसची तपासणी करण्यात आली. दरम्यान पाचव्या क्रमांकाच्या जनरल कोचमध्ये निळ्या रंगाची बॅग पडून असल्याचे दिसून आले. सदर बॅग संदर्भात रेल्वे प्रवाशांची विचारणा केली असती बॅग संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. यावर रेल्वे सुरक्षा बलच्या जवानांनी बॅग ताब्यात घेवून गोंदिया रेल्वेस्थानकात बॅगची तपासणी केली. बॅगमध्ये चार पॉकिटमध्ये पॅकिंग केलेला गांजा आढळून आला. सदर गांजा १ लाख ६४ हजार ४८० रूपये किंमतीचा होता. गांजा जप्त करून अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास रेल्वे पोलिसांकडून केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button