गोंदियाविदर्भ

भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक ; बाप-लेकीचा जागीच मृत्यू

अशोका हायवे कंपनीच्या विरोधात जनतेचा रोष

गोंदिया : भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार बाप लेकीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) रात्री रायपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बाह्मणी-खडकी जवळ घडली. दरम्यान, या अपघाताला अशोका हायवे कंपनीला जबाबदार धरत गावकऱ्यांनी या कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी एक तास रास्ता रोको आंदोलन केले. सूरजलाल वसाके (३३) व वेदिका वसाके (७) असे अपघातात ठार झालेल्या बापलेकीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, देवरी येथील फ्रुट विक्रेते सुरज वसाके हे शुक्रवारी आपल्या सासुरवाडी किन्ही येथून त्यांच्या चिमुकलीसह दुचाकी क्र.एम.एच.३५ ए. टी. ८६२४ ने देवरीकडे येत असताना रायपूरकडून नागपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्र.सी.जी.१६ एफ.०३२६ ने खडकी बाम्हणीजवळ दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत वडील सूरजलाल वसाके (३३) आणि वेदिका वसाके (७) या बाप व लेकीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करुन अशोका कंपनीवर कारवाई मागणी केली. याची माहिती मिळताच, उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील यांनी घटनास्थळ गाठून गावकऱ्यांची काढली. कंपनीने बंद केलेला रस्ता सुरू करून दोन्ही दोन्ही बाजूने वाहतूक सुरू केली.

ब्राह्मणी खडकी येथील आणि परिसरातील जनतेने शुक्रवारी अपघाताला घेऊन एक तास रस्ता बंद करून ठेवला. अग्रवाल व अशोका कंपनीच्या लोकांना बोलवा बोलवा, असा पवित्रा घेतला होता. दररोज अपघात होत असून, प्रशासन कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे आंदोलनाचा इशारा दिला आहे.

महामार्ग क्रमांक ५३ वर बाह्मणी-खडकी जवळ एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे तीन दिवसांत तीन अपघात झाले आहे. हे अपघात अशोका हायवे कंपनी व अग्रवाल ग्लोबल कंपनीमुळे होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी करीत कारवाईची मागणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button