भंडाराविदर्भ

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 15 ते 21 फेब्रुवारी दरम्यान श्रमसंस्कार शिबीर

भंडारा : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने मौजा पांढराबोडी येथे १५ ते २१ फेब्रुवारी 2025 दरम्यान सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्‌घाटन संस्थेच्या प्राचार्या जे.व्ही. निंबार्ते यांच्या अध्यक्षतेखाली, एमएमपी इंडस्ट्री मॅनेजर राकेश वाघाये, माजी जि.प. सदस्य प्यारेलाल वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच जगन्नाथ वाघमारे, शाळा समितीचे अध्यक्ष रवींद्र गाढवे, पोलिस पाटील वंदना वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य किरपान, गटनिदेशक सुधाकर शेंडे, कार्यक्रम अधिकारी एस.व्ही. साठवणे, एस.एल. साखरवाडे, सी.जी. चोपकर, व्ही.एस. भुरे, पी.एम. सतदेवे, कु. व्ही. टी. बघमारे आदी उपस्थित होते.

प्रत्येक दिवसाची सुरु‌वात जागरण, प्रार्थना व योगाकरून करण्यात येते, त्यानंतर न्याहारी व चहापान श्रमदान करण्यात येते. तसेच इलेक्ट्रिक, ए.सी., वेल्डिंग, फर्निचर किरकोळ दुरुस्तीचे कामे करण्यात येते. दुपारी भोजन त्यानंतर विविध बौद्धिक विषयावर ७ दिवस प्रभोधन करण्यात येते. रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन चक्रधर पाखमोडे यांनी केले तर आभार सौ. व्ही.एस. भुरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button