क्राईमगडचिरोलीविदर्भ

रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

महसूल विभागाची कारवाई

गडचिरोली : शहरालगतच्या कठाणी नदी पात्रातून रेती तस्कराकडून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे सोमवारी रात्री १२ च्या सुमारास महसूल विभागाच्या पथकाने सापळा रचून अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त केला. सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा केला आहे.

गडचिरोली शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शासनाच्या घरकुलाचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र, रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याने चोरट्या मार्गाने रेती तस्करांची मनमानी सुरू आहे. सध्या गडचिरोली जिल्ह्यात रेती घाटांचे लिलाव लांबणीवर आहे. त्यामुळे रेती तस्कर वाटेल तेव्हा रात्री-बेरात्री चोरट्या मार्गाने आणि मनमर्जी भावाने रेतीचा पुरवठा करीत आहे. दरम्यान, काल मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे महसूल वभागाने कारवाई करीत रात्री १२ च्या सुमारास गोकुलनगर येथील मिथुन केशव गेडाम यांच्या मालकीचा एमएच ३३ एफ ५०६८ क्रमांकाचा ट्रॅक्टर जप्त केला.

सदर कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार संतोष आरीकर, मंडळ अधिकारी राजू सिडाम, तलाठी सुभाष आळे, तलाठी राजकुमार वासनिक, तलाठी गणेश खांडरे, अरविंद शेंडे, संजय उसेंडी, अजय तुंकलवार यांनी केली. या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button