गडचिरोलीविदर्भ

अहेरी नगरपंचायत सभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) बाजी

अहेरी : नगर पंचायत येथे 20 फेब्रुवारी रोजी सभापती पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार गट) एकतर्फी विजय मिळवला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष रवी वासेकर यांच्या प्रमूख मार्गदर्शननाखाली जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांच्या प्रमूख उपस्थितीत सदर निवडणुकीत विजय रणनीती आखली गेली. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला एकतर्फी विजय खेचून आणण्यात यश प्राप्त झाले. अहेरी नगर पंचायत अध्यक्षा रोजा करपेत आणि अहेरी नगर पंचायत उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन यांच्या सहकार्याने हा विजय उत्तमरित्या पार पडला.

महिला व बालकल्याण सभापतीपदी नऊरास रियाज शेख, बांधकाम सभापतीपदी विलास गलबले, पाणी पुरवठा सभापतीपदी महेश बाकेवार यांची निवड करण्यात आली. या विजयात नगरसेवक यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 10 सदस्य एक जुटिने कार्य केल्याने एकतर्फी विजय मिळवला. जिल्हाध्यक्ष रवी वासेकर यांनी विजयी उमेदवारांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि सर्वांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button