गडचिरोलीविदर्भ

गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (जीडीपीएल) 2025 : आज तिसरा उपांत्यपूर्व सामना

प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन

गडचिरोली : गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2025 अंतर्गत तिसरा उपांत्यपूर्व सामना आज सायंकाळी 6:30 वाजता एमआयडीसी ग्राउंड, गडचिरोली येथे रंगणार आहे. या रोमांचक लढतीत आरमोरी स्टार हिटर्स आणि लॉयड्स डायमंड्स संघ आमनेसामने येणार असून, उत्कंठावर्धक क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संपूर्ण जिल्ह्याच्या क्रिकेटप्रेमींसाठी हा एक थरारक क्षण असणार आहे. मैदानावर कोणता संघ वर्चस्व गाजवणार? कोणती टीम उपांत्य फेरीत स्थान मिळवणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या सामन्यात मिळणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button