क्राईमगडचिरोलीविदर्भ

दारूविक्रेत्याचा 6 लाख 90 हजारांचा मुद्देमाल नष्ट

वैरागड येथील विक्रेत्यावर गुन्हा दाखल ; आरमोरी पोलिस व मुक्तीपथची संयुक्त कृती

गडचिरोली : आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत सोनपूर चक, वैरागड, कूकडी लगतच्या जंगलपरिसरात पोलिस मुक्तिपथ व गाव संघटनेने संयुक्त कृती करीत मोह फुलाचा सडवा, साहित्य व दारू असा एकूण 6 लाख 90 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. याप्रकरणी वैरागड येथील जगदिश पंडेलगोत या दारू विक्रेत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोहटोला, कुकडी येथील गावसंघटनेच्या गुप्त माहितीनुसार गाव संघटन, मुक्तिपथ तालुका टीम व पोलिस विभाग यांनी संयुक्त अहिंसक कृतीचे नियोजन करून सोनपूर चक, वैरागड, कूकडी वरून 900 मीटर जंगल परिसरात शोधमोहीम राबवली. यात वैरागड येथील रहिवासी असलेला जगदिश पंडेलगोत याच्या 4 मोहदारू भट्टी, दारू काढण्याचे साहित्य, ड्रम, मोठ्या कॅन मोह फुल दारू, छोट्या कॅन, मोहा सडवा, साखर 350 किलोग्रम, 8 मोहाच्या मोठ्या बोऱ्या व ईतर साहित्य जप्त करून स्पॉट पंचनामा करून एकुण 6 लाख 90 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. अहिंसक कृती करतेवेळी गाव संघटनेचे 5 पदाधिकारी उपस्थित होते.

ही कारवाई आरमोरी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक गणेश सहारे, पोलिस कॉन्स्टेबल देशमुख, कॉन्स्टेबल गुरुदेव, भांडेकर यांनी केली. यावेळी मुक्तीपथ आरमोरी तालुका संघटक विनोद एल. कोहपरे, उपसंघटक मनिषा प्रधान उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button