गोंदियाविदर्भ

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पहिला हप्ता वाटप व मंजूरीपत्र वितरण कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद

गोंदिया : प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वाटप तसेच 20 लाख लाभार्थ्यांना मंजूरी पत्र देण्याचे कार्यक्रम (दि. 22) रोजी जिल्हा परिषद गोंदिया येथील वसंतराव नाईक सभागृह येथे आयोजित करण्यात आला.

सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, सभापती रजनी कुंभरे, सभापती मुनेश रहांगडाले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) मधुकर वासनिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) फरेंद्र कुतीरकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, प्रकल्प संचालिका प्रमिला जाखलेकर, आमदार विनोद अग्रवाल, उपस्थित होते. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील व्ही.सी (दूरदृश्यनप्रणाली) द्वारे कार्यक्रमास उपस्थित होते.

ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा- 2: सन 2024-25 चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र तसेच 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे अनुदान निधी वितरीत करण्यात आले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शुभ हस्ते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम यांची विशेष उपस्थिती होती. व्ही.सी.द्वारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले.

गोंदिया जिल्ह्यात 34 हजार 63 लाभार्थ्यांना घरकुल मंजूरीचे आदेश पत्र प्राप्त झाले असून बांधकाम प्रक्रीयेसाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध झालेला आहे. राज्य शासनाच्या ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमाद्वारे लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राप्त होणार आहे.

मंचावर उपस्थित मान्यवरांनी योजनेविषयी मनोगत व्यक्त केले व योजनेची कामे वेळेवर व पारदर्शकपणे पूर्णपणे होणार असल्याचे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालिका प्रमिला जाखलेकर यांनी  केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील लाभार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामीण गृह निर्माण अभियंत्यांचे प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व लाभार्थ्यांना घरकुलांचे मंजुरी पत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमस्थळी लाभार्थ्यांकरिता आरोग्य तपासणी शिबीर, आधार अपडेशन कॅम्प, आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचे कॅम्प ची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी सांख्यिकी वैशाली खोब्रागडे यांनी केले तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेन्द्र कुतीरकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button