
ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरण
गडचिरोली : स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पार्टीच्यावतीने ‘अजितपर्व पदाधिकारी संपर्क अभियान’ कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमोल कुळमेथे यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राकाँच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या उपस्थितीत गडचिरोली शहराध्यक्ष पदावर नियुक्ति करण्यात आली. ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्याहस्ते गडचिरोली शहराध्यक्ष म्हणून अमोल कुळमेथे यांना नियुक्ती पत्र वितरित करण्यात आले.
नियुक्ती पत्र स्वीकारल्यानंतर अमोल कुळमेथे यांनी म्हटले कि, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला गडचिरोलीच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या विश्वासाला तड़ा न जाऊ देता मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकरिता तन-मन-धनाने प्रयत्न करणार तसेच गडचिरोली नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवारी निवडून आणण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहणार, असे मत व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, प्रदेश चिटणीस युनुस शेख, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष संजय शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, प्राध्यापक विठ्ठल निखुले, विजय धकाते, फहीम काजी, अज्जू शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमोल कुळमेथे यांनी गडचिरोली शहराध्यक्ष होण्याचे श्रेय माजी मंत्री व विद्यमान आमदार डाॅ. धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष लिललाधर भरडकर यांना दिले आहे



