
भंडारा : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भंडारा येथे संस्थेच्या प्राचार्या जे.व्ही. निंबार्ते यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या औचित्याने रक्तदान शिबिर व नेत्रदान बाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य जे.व्ही. निंबार्ते, शासकीय रुग्णालय भंडारा येथील डॉ. हेमा माथुरकर, खुशाल झाडे, मेघा पेनाम, अश्विन नेवारे तसेच नेत्रदान नेत्र विभागातील डॉ. दुर्गेश पसीने, समता इंगळे सोनाली लांबट उपस्थित होते. डॉ. हेमा माथुरकर यांनी रक्तदानाचे महत्त्व तसेच सोनाली लांबट यांनी नेत्रदानाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. तसेच संस्थेच्या प्राचार्या जे.व्ही. निंबार्ते यांनी रक्तदानाचे फायदे या विषयी प्रशिक्षणार्थ्यांना महत्त्वाची माहिती दिली. या कार्यक्रमाला संस्थेचे गटनिदेशक एम.एस. बदुकले, सुधाकर शेंडे तसेच संस्थेचे सर्व शिल्प निदेशक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.



