क्राईमगडचिरोलीविदर्भ

सहा किलो गांजा जप्त ; दोन आरोपींना अटक

अहेरी पोलिसांची कारवाई

गडचिरोली : गोपनीय माहितीच्या आधारे अहेरी पोलिसांनी दोन आरोपींकडून सुमारे सहा किलो गांजा जप्त केला आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. गणेश तुळशीराम सिडाम (३०, रा. दिनाचेरपल्ली), श्रीनिवास सीताराम आलाम (रा. कोलपल्ली, ता. अहेरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अहेरी पोलिस स्टेशनचे पथक आलापल्ली येथे पेट्रोलिंग करीत असताना दोन संशयित इसम एका पिवळ्या-काळ्या रंगाच्या बॅगसह दुचाकीने जात असल्याचे दिसून आले. पोलिस पथकाने बॅगची पाहणी केली असता, त्यांच्या ताब्यातील बॅगमध्ये सहा किलो वाळलेला गांजा (प्रतिकिलो २० हजार रुपये याप्रमाणे एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल) मिळून आला. आरोपींविरुद्ध पोलिस स्टेशन अहेरी येथे गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई ठाणेदार स्वप्नील ईज्जपवार, सहायक पोलिस निरीक्षक देवेंद्र पटले, पोलिस उपनिरीक्षक करिश्मा मोरे, विठ्ठल रामटेके, शंकर बेलाडे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button