क्राईमचंद्रपूरविदर्भ

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

१० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक 

सावली : तालुक्यातील लोंढोली येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांकडून १० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. २५) ग्रामसेवकाला रंगेहात अटक केली. चंद्रशेखर रामटेके असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.

लोंढोली येथील एका व्यक्तीला घरकुल मंजूर झाले. घरकुल अनुदानाचा पहिला हप्ता व दुसऱ्या हप्त्याची रक्कम अदा केली. तिसऱ्या हप्त्यासाठी प्रमाणपत्र सादर करावे लागते. लोंढोलीचे ग्रामसेवक चंद्रशेखर रामटेके याने प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांकडून २० हजारांच्या लाचेची मागणी केली. अखेर १० हजारांवर तडतोड झाली. मात्र, ही रक्कम द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार केली. पथकाने सापळा रचला. तक्रारी नंतर हे पथक तातडीने लोंढोली येथे पोहोचले. पानठेला परिसरात पथक दबा धरुन होते. लोंढोली येथे गावातील पानटपरीवर १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामसेवकाला रंगेहात अटक केली.

त्याच्याविरुद्ध सावली ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस प्रतिबंधक अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक पोलिस मंजूषा भोसले, नन्नावरे, हिवराज नेवारे, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे, संदीप कौरासे आदींनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button