
गुढीपाडव्यानिमित्त माजी आ. कृष्णा गजबे यांचे शुभहस्ते बांधकामाचे भूमिपूजन
आरमोरी : तालुक्यातील वासाळा गावातील तरुणांनी व नागरिकांनी काही वर्षांपूर्वी आपल्या गावामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा संकल्प केला होता. एकमुखाने त्याला मान्यता मिळाल्यानंतर पुतळा उभारण्याकरिता लागणाऱ्या सर्व शासकीय परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्षपणे कामाला सुरुवात करण्याकरिता गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ३० मार्च रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांचे शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
गावातील लोक सहभागातून हे काम पूर्ण होणार असून वासाळा गावातील प्रत्येकाचा त्यामध्ये हातभार लागला आहे. सोबतच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तीने देखील या कामी मदतीचा हात दिला आहे. सर्वांच्या मदतीने व सहकार्याने अतिशय सुंदर अशा पद्धतीने वासाळा गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारण्यात येणार आहे.
भूमिपूजनाप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, भाजपचे ज्येष्ठ नेते राम पडोळे, गोलू वाघरे, आशिष वरखडे, विकास बोरकर, अनिल आलमकर, अरविंद शेलोटे, कालिदास मेश्राम, मोरेश्वर मेश्राम, नीलकंठ मगरे, प्रमोद सेलोटे, आसिक बोरकर, विजय जराते, रवी सेलोटे, बाबुराव भोयर, दिलीप राऊत, प्रफुल मगरे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.



