गडचिरोलीविदर्भ

भाजपा सदस्य नोंदणी, सक्रिय सदस्य नोंदणी व बुथ रचना त्वरीत करा – जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम

अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपा सदस्य नोंदणी, सक्रिय सदस्य नोंदणी, बुथ रचना बाबत आढावा बैठक

अहेरी : देश स्तरावर, राज्य, जिल्हा, मंडल व बुथ स्तरापर्यंत नविन भाजपा पदाधिकारी यांची रचना करायची असल्याने भाजपा सदस्य नोंदणी, सक्रिय सदस्य नोंदणी व बुथ रचना होने गरजेचे आहे. यानंतर मंडल रचना, जिल्हा रचना तयार करावयाची असल्याने अहेरी विधानसभेतील मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, भामरागड व सिरोंचा मंडलात पक्षाने दिलेले कार्य त्वरीत व वेळेत पुर्ण करा, असे आवाहन भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम यांनी केले.

मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी येथील ऑफलाईन सदस्य नोंदणी फार्म, ऑनलाईन सदस्य, सक्रिय सदस्य, व बुथ रचनेचा आढावा घेऊन पदाधिकारी यांच्याशी संवाद करताना ते बोलत होते. यावेळी नगरसेवक आशीष पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता, सुनिल बिश्वास, बाबुराव गंफावार, बादल शाहा, बिधान वैद्य, संजय सरकार, निखील गाद्देवार, प्रसाद पुल्लूरवार उपस्थित होते. आढावा बैठकीचा समारोप भाजपा प्रदेश सदस्य रवि ओल्लालवार यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button