क्राईमचंद्रपूरनागपूरविदर्भ

चार वर्षांपासून फरार दोन आरोपींना अटक

नागपुरातील मध्यवर्ती कारागृहातून झाले होते फरार

चंद्रपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृह शिक्षा भोगत असताना, कोरोना संक्रमण काळात आकस्मिक अभिवचन रजेवर असताना, विहीत कालावधीत कारागृहात परत न येता फरार झालेल्या दोन बंद्यांना स्थानिक गुन्हे शाखेने चार वर्षानंतर अटक करून नागपूर कारागृहात रवानगी केली आहे. विकास उर्फ विक्की बद्रीप्रसाद तिवारी व दीपक उर्फ सुरेश यशवंत पुणेकर, असे फरार बंदिवानांचे नाव आहे.

२०२० मध्ये सर्वत्र कोरोना संक्रमण होते. कारागृहातील कैद्यांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी सर्वांना रजेवर पाठविण्यात आले होते. रामनगर ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या गुन्हयात नागपूर मध्यवर्ती कारागृह शिक्षा भोगत असताना, बंदी विकास तिवारी रा. इंदिरानगर चंद्रपूर हा ८ मे, २०२० रोजी ४५ दिवसांच्या कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. मात्र, विक्की तिवारी विहीत वेळेवर कालावधीत कारागृहात परत न येता अनधिकृतपणे फरार असल्याने त्याच्याविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, राजुरा पोलिस ठाण्यातंर्गत गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला बंदी दीपक उर्फ सुरेश यशवंत पुणेकर हा सुद्धा रजेवरून अनधिकृतपणे फरार होता. दोघांचाही पोलिस शोध घेत होती. मात्र, पोलिसांना वारंवार चकमा देत होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील फरार असलेल्या बंदिवानांना पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यात २२ ते २७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत फरार बंदी शोध मोहीम राबविण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे शोध पथकाने फरार बंदी विकास उर्फ विक्की बद्रीप्रसाद तिवारी आणि बंदी दीपक उर्फ सुरेश यशवंत पुणेकर यांचा कसोशीने शोथ लावून अटक केली. दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून संबंधित पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केले. या दोघांची वैद्यकीय तपासणी करून दोन्ही बंदींना नागपूर जिल्हा मध्यवर्ती कारागह नागपूर येथे दाखल करण्यात आले.

ही कारवाई एलसीबीचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि. दीपक कांकेडवार, स्वामीदास चालेकर, प्रकाश बलकी, अजय बागेसर, किशोर वैरागडे, नरोटे व चापोहवा अराडे यांच्यासह स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button