गडचिरोलीचंद्रपूरविदर्भ

महावितरण विद्युत सहायक पदाच्या उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीची अंतिम संधी

पूरग्रस्त आणि गैरहजर उमेदवारांना ९ व १० सप्टेंबर रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर: महावितरणने विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आणखी एक अंतिम संधी दिली आहे. २० ते २२ ऑगस्ट दरम्यान पडताळणी पूर्ण झाली असली, तरी राज्यातील अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि इतर अपरिहार्य कारणांमुळे अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांना आता ९ व १० सप्टेंबर रोजी उपस्थित राहता येणार आहे.

महावितरणने जाहिरात क्रमांक ०६/२०२३ नुसार विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी २० ते २२ ऑगस्ट या कालावधीत संबंधित परिमंडलांमध्ये करण्यात आली होती. मात्र, जे उमेदवार या तीन दिवसांत उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनाच ही विशेष संधी देण्यात आली आहे. ९ व १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता संबंधित उमेदवारांनी स्वतः त्यांच्या ऑनलाइन अर्जातील नोंदी, पात्रता, आणि सर्व मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांसह त्यांना नेमून दिलेल्या परिमंडल कार्यालयात उपस्थित राहावे.

महावितरणने स्पष्ट केले आहे की, या अंतिम संधीनंतरही जे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणार नाहीत, त्यांची निवड रद्द मानली जाईल आणि भविष्यात त्यांच्याशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. पडताळणीत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या नियुक्तीची पुढील कार्यवाही त्यांच्या संबंधित परिमंडलांमध्ये केली जाईल. यासंदर्भात अधिक माहिती महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button