गोंदियाविदर्भ

प्रभातफेरीव्दारे जागतिक श्रवण दिनाची जनजागृती

‘जीवनाचे संगीत ऐका-तुमचे श्रवणशक्तीचे रक्षण करा’ या घोषणाने शहर दुमदुमले

गोंदिया : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ३ मार्च ते १० मार्च २०२५ रोजी “जागतिक श्रवण दिन सप्ताह” जिल्हास्तरावर साजरा करण्याबाबत सुचित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध उपक्रमातुन श्रवण बाबतची जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन जिल्हा आरोग्य प्रशासन, के.टी.एस. सामान्य रुग्णालय व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या एकत्रित सहकार्याने जागतिक श्रवण दिन सप्ताह अनुषंगाने 6 मार्च रोजी प्रभातफेरीच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आली.

केटीएस सामान्य सामान्य रुग्णालय येथुन जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांनी हिरवी झेंडी दाखवुन रॅलीचे उद्घाटन केले. प्रभातफेरी केटीएस सामान्य रुग्णालय येथून बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय चौक, सिव्हील लाईन-रेल्वे स्टेशन चौक-इंदिरा गांधी स्टेडीयम चौक भागात प्रभातफेरी काढण्यात आली. विविध संदेश देत जनजागृती करण्यात आली. प्रभातफेरीद्वारे समाजामध्ये जनजागृती निर्माण होण्यासाठी विविध प्रकारचे माहिती फलक घेऊन विद्यार्थ्यांनी फेरीत सहभाग घेतला.

रॅली दरम्यान “जागरूकता पसरवा- श्रवणशक्ती वाचवा”, “निरोगी श्रवण-आनंदी हृदय”, “कान ही मौल्यवान देणगी आहे-त्यांना गृहीत धरू नका”, “उद्या चांगल्यासाठी आजच तुमचे श्रवणशक्तीचे रक्षण करा”, “निरोगी श्रवणशक्ती-आनंदी जीवन”, “कान हे जगाचे खिडक्या आहेत-त्यांना उघडे ठेवा”, “जीवनाचे संगीत ऐका-तुमचे श्रवणशक्तीचे रक्षण करा” असे विविध आरोग्यदायी संदेशाने परिसर दुमदुमला. इंदिरा गांधी स्टेडीयम चौक येथील परिसरात नर्सिंग महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी यांचेमार्फत श्रवण प्रतिबंधात्मक व जनजागृतीपर कलापथक रोड-शो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे व जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात यांनी श्रवणदोष आजार तपासणी बाबतचे शासनाच्या योजनांची माहीती विषद करुन जनजागृती केली.

प्रभातफेरी दरम्यान निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती ज़ायस्वाल, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय घोरमारे, कान-नान-घसा तज्ञ डॉ. गुरुप्रकाश खोब्रागडे, अंसासर्गिक आजार कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. स्नेहा वंजारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे, जिल्हा आय.ई.सी. अधिकारी प्रशांत खरात, ऑडीयोमेट्रीक तज्ञ रोशन कुर्वे, ऑडीयोमेट्रीक सहायक प्रणोती शहारे, डॉ. मिना वट्टी, डॉ. सुवर्णा उपाध्याय, वार्डन दिपीका गजभिये, विवेकानंद कोरे यांचे समवेत के.टी.एस. सामान्य रुग्णालयाचे इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button