गडचिरोलीविदर्भ

माजी खा. अशोक नेते यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना साहित्य वाटप

चामोर्शी : तालुक्यात बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या वतीने विशेष साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना पेट्या वितरित करण्यात आल्या. या सोहळ्यात त्यांनी बांधकाम मजुरांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमाला जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सहकार आघाडी प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशीष पिपरे सोबत संबंधित अधिकारी व मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते.

शासनाच्या मदतीने श्रमिकांना आधार

बांधकाम क्षेत्रात राबणाऱ्या कामगारांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, त्यांच्या कल्याणासाठी ठोस उपाययोजना केल्या जाव्यात, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरला. कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी अशा योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जावी, असे विचार यावेळी माजी खा. नेते यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button