गडचिरोलीविदर्भ

जिल्हा परिषदेवर धडकला आयटकचा मोर्चा

आशा वर्कर, गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी

गडचिरोली : आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन संलग्न आयटकच्या वतीने आशा व गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, किमान वेतन लागू करा, दिवाळी बोनस दरवर्षी दोन हजार रुपये देण्यात यावे, कोरोना थकीत मानधन ग्राम पंचायत, नगर परिषद व नगरपंचायतीने तत्काळ द्यावे आदी मागण्यांसाठी आयटकचे राज्य सचिव विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात शुक्रवार, ७ मार्चला जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

धरणे आंदोलनादरम्यान मार्गदर्शन करताना झोडगे म्हणाले, सप्टेंबर २०१८ पासून केंद्र शासनाने मोबदल्यामध्ये कोणती वाढ केली नाही. कोरोनाच्या काळात आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्याकडून काम करवून घेतले. त्यानंतरही ३१ महिन्याचा दरमहा एक हजार रुपये थकीत मोबदला आतापर्यंत अनेक ग्रामपंचायत, नगर परिषद व नगर पंचायतीने दिला नाही, त्याची तातडीने अमंलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, संघटक चुन्नीलाल मोटघरे, संघटनेच्या जिल्हा सचिव सरिता नैताम, कार्याध्यक्ष विद्यादेवी येजुलवार, छाया शेडमाके, माया कांबळे, करुणा गुरनुले, किरण गजभिये, सपना पट्टेम, लक्ष्मी कवडो, उज्वला चांदेकर, शीला टेकाम, सुरेखा तोटावार, निवृत्ता सयाम, अंतकला जाळे, किरण गांधारे, सपना मजूमदार, अनुप्रिया भसारकर यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

गट प्रवर्तक यांना कंत्राटी कर्मजारी दर्जा देऊन शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे. आशा व गट प्रवर्तक यांना सेवानिवृत्तनंतर ५ लाख रुपये ग्रॅज्युटी, १० हजार रुपये मासिक पेन्शन व २ हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात यावा, यासोबतच त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन किमान वेतन लागू करण्यात यावे आदी मागण्यांवर मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button