गडचिरोलीविदर्भ

कामगारांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन पेट्यांचे वाटप करा – माजी आ. डॉ. देवराव होळी

चामोर्शी येथील पेट्या वाटपात कामगारांची प्रचंड गैरसोय, हयगय करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करा

चामोर्शी : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून चामोर्शी येथे कामगारांना पेट्यांचे वाटप करण्यात येत आहे. परंतु पेट्यांचे वाटप करताना कामगारांना दिवसभर उन्हा तान्हात ताटकळत ठेवून त्यांची प्रचंड गैरसोय करून कर्मचारी व अधिकारी या पेट्यांचे वाटप करताना दिसून येत आहेत. याबाबत कामगारांमध्ये प्रशासनाविषयी चीड निर्माण होत असून त्या संदर्भात कामगारांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन पेट्यांचे वाटप करावे, अशी सूचना माजी आमदार तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी कामगार मंडळ प्रशासनाला केली आहे.

यावेळी त्यांनी पेट्यांचे वाटप होत असलेल्या ठिकाणाला भेट देऊन कामगारांची वार्तालाप केला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दिवसभर कामगारांना ताटकळत ठेवून त्रास देणाऱ्या व पेट्या वाटपात कामगारांची  गैरसोय व हयगय करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button