गडचिरोलीविदर्भ

गडचिरोली जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे वार्षीक अधिवेशन उत्साहात

गडचिरोली : जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे ११ वे वार्षीक अधिवेशन ९ मार्च २०२५ रोज रविवारला शिवाजी महाविद्यालय, गडचिरोली चे सभागृहात उत्साहाने पार पडले. अधिवेशनाचे उ‌द्घाटन आमदार रामदास मसराम यांनी केले. अध्यक्षस्थान शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, गडचिरोलीचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री यांनी भुषविले, प्रमुख अतिथी म्हणुन माजी शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे, नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष अनिल बोरागमवार, प्रमुख कार्यवाह भाऊराव पत्रे, कोषाध्यक्ष मारोती राऊत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे, प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष धनपाल मिसार, डॉ. अशोक माथनकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष जगदीश म्हस्के, सचिव  रविंद्र समर्थ व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

उद्घाटनीय भाषणात आ. रामदास मसराम यांनी वाचनालयाच्या समस्यांशी अवगत होऊन ग्रंथालयाचे प्रश्न सभागृहात सोडविण्याचे आश्वासन दिले. आधिवेशनात उपस्थित मान्यवरांनी ग्रंथालय चळवळीचे महत्व विशद करून ग्रंथालय चळवळ घराघरात पोहचविण्याचे महत्व पटवून दिले.

अधिवेशनाचे दुसरे सत्र जिल्हा ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष अरुण मुनघाटे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले. यात ग्रंथालायातील उपयुक्त अभिलेखे यावर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले. तसेच ग्रंथालयातील साधन सामुग्रीचा विमा काढण्याचे संदर्भात रमेश भटलवार यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले. खुल्या अधिवेशनात ग्रंथालयाला ४० टक्के जाहीर केलेली अनुदानवाढ मंजूर करणे, नवीन ग्रंथालयांना शासन मान्यता देणे, ग्रंथालयांना दर्जा बदल मंजूर करणे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबाबत केंद्र शासनाचे अभिनंदन ठराव मंजूर करून शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत ठरविण्यात आले.

अधिवेशन यशस्वी करण्याकरिता मुकुंद म्हशाखेत्री, अमृत पिपरे, हरिराम मातेरे, अशोक चलाख, प्रियंका म्हस्के, भारती समर्थ, प्रमोद शेंडे, अविनाश निकोडे, विकास पाल, संतोष म्हशाखेत्री, भास्कर चौधरी, जगदीश हरडे, किशोर हरडे, स्वप्नील पिपरे, प्रभाकर पाल, डोमाजी मुनघाटे, रविसागर चुधरी, प्रभाकर नरुले, देवेंद्र ब्राम्हणवाडे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. अधिवेशनाला जिल्ह्यातील संपूर्ण ग्रंथालयांचे सेवक व पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रगीताने अधिवेशनाचा समारोप करून संघातर्फे सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button