क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

कंत्राटी कार्यकारी लेखापाल लाच स्वीकारताना जाळ्यात

माल वाहतूक वाहन खरेदी कर्ज मंजुरीकरिता ५० हजार लाचेची मागणी 

गडचिरोली : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडून माल वाहतूक वाहन खरेदी कर्ज मंजुरीकरिता तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, गडचिरोली येथील कंत्राटी कार्यकारी लेखापालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पडकले. रुपेश वसंत बारापात्रे, (वय 40) असे कंत्राटी लेखापालाचे नाव आहे.

तक्रारदार हे आदिवासी समाजातील बेरोजगार युवक असुन त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे माल वाहतूक वाहन खरेदी कर्ज मंजुरी करिता अर्ज केला होता. या अनुषंगाने तक्रारदार यांना 10 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करने करिता रुपेश बारापात्रे याने शाखा व्यवस्थापक हर्शल बोरोले यांचे नावे 50 हजाराच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी  12 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथे तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने 12/03/2025 व 13/03/2025 रोजी लाच मागणी पडताळणी केली असता रुपेश बारापात्रे याने तक्रादारास शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, गडचिरोली अंतर्गत मालवाहू वाहन खरेदी कर्ज मंजूर करणेसाठी शाखा व्यवस्थापक हर्षल बोरोले यांच्या नावे 50 हजार रुपयांची मागणी मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीच्या पथकाने १७ मार्च रोजी सापळा रचून रुपेश बारापात्र यास 50 हजारांची लाच रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पडकले. आरोपी रुपेश बारापात्रे यास ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.

ही कारवाई लाप्रवि पोलीस उप अधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड, स.फौ. सूनिल पेद्दिवार, पोहवा किशोर जौंजळकर, राजेश पद्म्गीरवार, स्वप्निल बांम्बोले, पोशी संदीप घोरमोडे, संदीप उडान, हितेश जेट्टिवार, मपोशी जोत्स्ना वसके, विद्या मशाखेत्री, चा.पो.हवा. राजेश्वर कुमरे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button