गोंदियाविदर्भ

शाळेत शिरले कालव्याचे पाणी

बरडटोली जिप प्राथमिक शाळेतील प्रकार 

अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरडटोली येथे कालव्याचे पाणी शिरले. यामुळे एकच तारांबळ उडाली. या प्रकाराने शिक्षण विभागाचा कारभार उजागार झाला असून ज्ञानार्जनसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

बरडटोली शाळेत ३८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु त्यांना सुरक्षित शिक्षण मिळेल, असे दिसून येत नाही. शाळेतील एक ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी पावसाळ्यात पुराचे पाणी आणि उन्हाळ्यात कालव्यामधून गळणारे पाणी शाळेच्या आवारात साचते. आज १८ मार्च रोजी इटियाडोह कालव्याचेपाणी शाळेच्या परिसरात शिरले. यामुळे काही काळ एकच खळबळ उडाली. शाळेच्या शौचालय आणि बाथरूममध्ये पाणी साचल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना त्यांचा वापर करणे अशक्य झाले. हे पाणी शाळेच्या मुख्य दारात साचल्याने विद्यार्थ्यांना वर्गात ये-जा करूने धोकादायक झाले आहे. या संदर्भात शिक्षण विभागाला अनेकदा माहिती देवूनही उपाययोजना करण्यात आली नाही. यामुळे एखाद्या अप्रिय घटनेनंतरच विभागाची झोप उघडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला घेवून पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button