गडचिरोलीविदर्भ

शाळा परिसरातील पानठेले हटवा, शाळा तंबाखुमुक्त करा

मुक्तिपथ तालुका समितीच्या बैठकीत तहसीलदारांचे आदेश

गडचिरोली : नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या कोरची तालुक्यातील विविध गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री बंद करणे आवश्यक आहे. यासाठी पोलिस विभागाने विक्रेत्यांवर कारवाई करावी तसेच शाळा परिसरातील पाणठेले हटवून शाळा तंबाखुमुक्त करावे, असे आदेश मुक्तिपथ तालुका समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार प्रशांत गड्डम यांनी दिले.

कोरची तहसील कार्यालयात मुक्तिपथ तालुका समितीची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीत वैद्यकिय अधिकारी डॉ. थुल, मुक्तीपथ संघटक निळा किन्नाके, संवर्गविकास अधिकारी राजेश फाये, मुख्यधिकारी विकास सिंगाडे, बि.सी. धार्मीक प्रा. चद्रलाल मांडवे, प्रांजली मेश्राम, रुपेश भैसारे, अरुणा गोन्नाडे, भुषण डोकरमारे आदी उपस्थित होते.

बैठकीत शासकिय, निमशासकिय कार्यालय व्यसनमुक्त करणे अनिर्वाय आहेत. यासाठी फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले. ६ ते १८ खालील बालकांपासून तंबाखू कोसो दुर ठेवणे खुप गरजेचे आहे. याकरिता नगरपंचायत, महसुल, आरोग्य विभाग, मुक्तीपथ यांच्या पथकाच्या माध्यमातुन शाळा परीसरातील पानटपऱ्या हटविण्याची सूचना नगरपंचायत मुख्यधिकारी यांना देण्यात आली. तालुक्यातील सर्व शाळा तंबाखुमुक्त करण्याकरीता गट शिक्षण अधिकारी यांना पत्राच्या माध्यमातून माहीती दिली, सर्व ग्राम पंचायत समीती पुनर्गठित करुण सक्रीय करावे तरच काही गावात अवैध दारु विक्री असलेली बंद होण्यास सहकार्य मिळेल. आपला तालुका नक्षलग्रस्त असल्याणे पोलीस ठाणे व पोलीस मदत केंद्र अंतर्गत  गावात दारु विक्रीचे प्रमाण आहे ही समस्या बघता तालुक्यातील तरुणाचे पिण्याचे प्रमाण वाढत आहे, जर या गातील अवैध दारु विक्री बंद झाली तर  बरेचसे गाव बंद होतील व युवकांचे दारु पिण्याचे प्रमाण कमी होईल. कार्यालयीन वेळेत कोणी दारु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करून आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. या विषयावर सखोल चर्चा करुण निर्णय घेऊन समीतीच्या मान्यतेने सुचना देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button