गडचिरोलीविदर्भ

अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई ; कुरखेडा तहसिलने वसूल केला ५० लाखांचा महसूल

कुरखेडा : रेती घाट लिलाव न झाल्याने तालुक्यात मोठ्याप्रमाण अवैध रेती उपसा होत असतो. रात गस्त, चेकपोस्ट असूनही रेती तस्कर रेती उपसा करत आहेत. अशातच या अवैध गौण खनिज उपशा विरोधात कारवाई करत कुरखेडा महसूल विभागाने मागील आर्थिक वर्षात शासनाच्या तिजोरीत तब्बल ४८ लाख रुपये महसूल जमा केला आहे.

एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत महसूल विभागाने ४० वाहनांवर जप्ती कारवाई केली आहे. या अवैध वाहतूक वाहनांमध्ये अवैध मुरूम वाहतूक करणारे एकूण ९ वाहने असून ३१ वाहन हे अवैध रेती वाहतूक करताना आढळलेले आहेत. या ४० वाहनानपैकी ३८ वाहन चौकशी अंती प्रत्यक्ष दंडास पात्र ठरले आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाया करून शासनाचा महसूल वसूल करणाऱ्या येथील तालुका प्रशासनसमोर मुख्य तस्करांचे मोठे आव्हान आहे. या मुख्य तस्करांच्या मुसक्या कधी आवरण्यात येथील असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. महसूल विभाग या मुजोर गुंडगिरी करणाऱ्या रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यात कमकुवत ठरत आहे. या तस्करांच्या वाहनांवर कारवाया झाल्या मोठ्याप्रमाणत महसूल तर वसूल होईलच सोबतच येथील रेती तस्करीच्या माध्यमाने पोसली जाणारी गुंडगिरीवर ही नियंत्रण मिळविता येईल.

कुरखेडा येथे मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने पोचत असलेल्या रेती साठ्यांवर पंचनामे करून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिस बजावलेल्या रेतीसाठा धारकांनी रेती संबंधी वैध पुरावे सादर न केल्यास त्यांना पाचपट दंड भरावा लगणार आहे. या दंडामुळे शासनाच्या तिजोरीत लाखो रुपयाचा महसूल जमा होणार आहे.

रेती, मुरूम सोबतच तालुक्यात मोठ्या प्रमाणात लाल विटा निर्मिती केल्या जाते. सध्या घरकुल मोठ्या प्रमाणत मंजूर झाल्याने विटांची मोठी मागणी आहे. अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात विटा तयार करून विकल्या जातात ज्याचा शासनाला मोठा फटका बसतो. लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे. नियमानुसार माती पासून या विटा बनविण्याआधी महसूल विभागाकडे रीतसर अर्ज करून परवाना मिळविणे बंधनकारक आहे. परंतु असे परवाने न घेता मोठ्या प्रमाणात विटा निर्मिती व विक्री केली जाते. येथील महसूल विभागाने या वर्षी काही अवैध विटा निर्मिती करणाऱ्यांना नोटिस बजावून दंड आकारले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button