
रामनगर येथील शेंडे ले-आऊट कॉलनी परिसरातील घटना
चंद्रपूर : क्षुल्लक वादातून घरासमोरील पार्किंगमधील दोन दुचाकी तेथीलच पेट्रोल टाकून जाळल्याची खळबळजनक घटना घटना रामनगर येथील शेंडे ले-आऊट कॉलनी परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यामध्ये अमित याच्याविरुद्ध बैरागी बीएनएसच्या कलम ३२६ (ए) ११८ (१) ३५२, ३५१ अन्वये गुन्हा दाखल केला.
जिराल्ड गेब्रियल फिलिप्स यांच्याशी बैरागी यांचा क्षुल्लक कारणावरून कौटुंबिक वाद झाला. ही बाब अमितने मनात ठेऊन जयराज धाबा येथील टू व्हीलर वाहन व त्यांच्या घरातील पार्किंगमधील दुचाकी त्याच गाडीतील पेट्रोलचे पाइप काढून जाळले. अशी तक्रार जिराल्ड फिलिप्स यांनी रामनगर ठाण्यात केली. त्यावरून बैरागी याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांनी दिली.



