चंद्रपूरविदर्भ

स्वीडिश दाम्पत्याने दिव्यांग बालकाला घेतले दत्तक

किलबिल संस्थेतून बालकाची दत्तक प्रक्रिया

चंद्रपूर : दिव्यांग बालक दत्तक घेण्याचे धाडक सहसा कुणी करीत नाही. मात्र, हे करून दाखविले आहे एका स्वीडिश दाम्पत्याने. स्पेशल नीड (व्यंगत्व) असलेल्या बालकाला त्याच्या जन्मदात्यांनी नाकारले. परंतु स्वीडन येथील निपुत्रिक दाम्पत्याने या बालकाला स्वीकारून थेट स्वीडन गाठण्याची तयारी केली आहे.

केंद्रीय दत्तक नियमावली अंतर्गत प्रक्रिया करून जिल्हा न्यायालयातून बालकाला कायदेशीर दत्तक देण्यात आले. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांच्या हस्ते दत्तक निरोप समारंभ झाला. या कार्यक्रमात बालकाला स्वीडन येथील रिकार्ड टोबायस हेडबर्ग आणि मारिया एलिझाबेथ व्हिक्टोरिया एरिक्सन या परदेशातील पालकाकडे सुपूर्द करण्यात आले.

दत्तक प्रक्रियेच्या माहितीसाठी चाइल्ड हेल्पलाईनच्या १०९८ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने केले आहे. दत्तक प्रक्रिया करताना किलबिल दत्तक संस्थेच्या संस्थापिका प्रभावती मुठाळ, उपाध्यक्षा वंदना खाडे, डॉ. विद्या बांगडे, हेमंत कोठारे, किलबिल दत्तक व बालगृहाचे कर्मचारी उपस्थित होते.

अनाथ, परित्याग केलेले, सोडून दिलेले बालकाचे संरक्षण, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाइल्ड हेल्पलाईनद्वारे सेवा दिली जाते. अशा बालकांच्या पालन पोषणकरिता किलबिल संस्था कार्यरत असून, समितीच्या आदेशाने दाखल केले जाते. यानंतर बालकांना बालकल्याण समितीद्वारे दत्तक मुक्त होतो. दत्तक इच्छुक पालक महिला व बालविकास मंत्रालयाच्या सीएआरए संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून बालक दत्तक घेऊ शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button