आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते १ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

गडचिरोली : गडचिरोली शहराच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असून शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आपण उपलब्ध करून दिला असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोलीतील शाहूनगर, विवेकानंद, व कार्मेल शाळेच्या मागील परिसरातील १ कोटी रुपयांच्या सिमेंट रस्ते, बंदिस्त नाली इत्यादी कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले.
याप्रसंगी लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, माजी उपसभापती विलास दशमुखे, देवाजी लाटकर, संजय बर्वे, रामकृष्ण ताजने, युमो तालुका अध्यक्ष निखिल धोडरे, राजू कांबळे, अरबाज शेख, वालदे, आकरे, वराठे, समीर ताजने, आशा शेंडे, विद्या उईके, टेभुर्णे, हिम्मतराव खरवडे, पंकज शृंगारपवार, योगेश कोडापे, विपुल येल्लट्टीवार, शामराव रामटेके, मोहन येरमे, गौरव येणप्रेड्डीवार उपस्थित होते.



