
माजी आ. कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार
कोरची : कोरची येथील मोरेश्वर महाविद्यालयात रविवार, १० ऑगस्ट रोजी भाजपची तालुका विस्तारित कार्यकारिणी बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीला माजी आ. कृष्णा गजबे यांनी विशेष उपस्थिती लावून कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरला. येणाऱ्या काळात पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीत माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते भाजपच्या नवनियुक्त तालुका कार्यकारी पदाधिकारी आणि सदस्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. तसेच, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा कार्यकारिणीतील भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष प्रा. देवराव गजभिये यांचे शाल आणि नारळ देऊन स्वागत व सत्कार केला.
बैठकीत भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य नसरुद्दीन भामानी, डॉ. शैलेंद्रकुमार बिसेन, तालुकाध्यक्ष सदाराम नु्रुटी, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष प्रा. देवराव गजभिये, जिल्हा सचिव आनंद चौबे, कमलनारायण खंडेलवाल, भाजप तालुका महामंत्री घनशाम अग्रवाल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद कोरेटि, शहर अध्यक्ष स्वप्नील कराडे, उपाध्यक्ष प्रेमलाल उसेंडी, युवा मोर्चा महामंत्री प्रशांत कराडे, युवा मोर्चा उपाध्यक्ष अविनाश हारामी, महिला मोर्चा अध्यक्षा सीला सोनकुतरी, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर नखाते, नंदकिशोर वैरागडे, महादेव बनसोड, अशोक गावतुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सदस्य बैठकीला उपस्थित होते. संचालन भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विनोद कोरेटि यांनी तर आभार सुरेश काटेंगे यांनी मानले.



