गडचिरोलीविदर्भ

उषाताई वायलालवार यांचे निधन

चामोर्शी : येथील माजी उपसरपंच प्रमोद सावकार वायलालवार यांच्या पत्नी,  काँग्रेसचे गटनेता तथा नगरसेवक नितीन वायलालवार, पंकज वायलालवार यांच्या आई, दिप्ती नितीन वायलालवार व नगर पंचायतच्या अध्यक्षा जयश्रीताई वायलालवार यांच्या सासूबाई उषाताई प्रमोद वायलालवार (वय ६८ वर्ष) यांचे हृदयविकाराने २७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, दोन भाऊ, दोन सुनबाई, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. दुपारी ४ वाजता हजारो नागरिकांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र मार्कंडादेव येथील वैनगंगा नदी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button