क्राईमगडचिरोलीविदर्भ

घरातून 1 लाख 29 हजारांची दारू जप्त

पोलीस विभाग व मुक्तीपथ यांची संयुक्त कारवाई 

धानोरा : तालुक्यातील काकडयेली टोली येथील अवैध दारू विक्रेत्याच्या घरावर धाड टाकून 1 लाख 29 हजार 100 रुपये किमतीची देशी-विदेशी दारू व फ्रिज जप्त केल्याची कारवाई धानोरा पोलीस व मुक्तीपथ तालूका चमूने संयुक्तरित्या केली. याप्रकरणी दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काकडयेली टोलीवर एका घरातून अवैध दारूविक्री सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित विक्रेत्याच्या घरावर पाळत ठेवली होती. दरम्यान, विक्रीकरिता दारू असल्याची खात्रीदायक माहिती मिळताच पोलिस व मुक्तिपथ टीमने संयुक्तरित्या संबंधित घरावर धाड टाकली असता, देशी, विदेशी दारू आढळून आली. सोबतच फ्रिजमध्ये सुद्धा दारू मिळाली. पोलिसांनी पंचनामा करीत एकूण 1 लाख 29 हजार 100 रुपये किमतीची देशी-विदेशी दारू व फ्रिज जप्त केली. याप्रकरणी संबंधित विक्रेत्यावर धानोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे खळबळ निर्माण झाली असून दारू विक्रेत्यावर पोलिसांनी पाळत ठेवली आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जंगले, पोलिस हवालदार भजनराव गावडे, पोलिस शिपाई प्रवीण राऊत, पोलिस शिपाई गोरखनाथ चव्हाण, पोलिस शिपाई अमित हिडामी यांनी केली. या कृतिमध्ये मुक्तीपथचे सहसंचालक संतोष सावळकर, मुक्तीपथ तालूका संघटक राहुल महाकुलकर, मुक्तीपथ कार्यकर्ती शितल गुरनुले, राकेश ढवळे सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button